Random Video

भाजपचा पुणे महापालिकेत राडा

2021-06-12 0 Dailymotion

पुणे महापालिकेत आज सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरुन राडा घातला. यात पालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांचे कार्यालय व भाजपचे पक्ष कार्यालय यांचे मोठे नुकसान झाले.
स्विकृत सदस्य निवडीसाठी आज पालिकेत भाजपची बैठक होती. स्विकृत सदस्यपदी भाजपचे गणेश घोष यांची निवड निश्चित मानली जात होती. मात्र, ऐनवेळी पक्षनेते भिमाले यांनी माजी गटनेते गणेश बीडकर व रघू गौडा यांची नांवे जाहीर केली. त्यावेळी नाराज झालेल्या गणेश घोष व भिमाले यांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. या वेळी दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन सभागृहनेत्यांचे कार्यालय व भाजपचे पक्षकार्यालय यांचे मोठे नुकसान झाले.