Random Video

Pune : पिंपरीत पंकजा मुंडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

2021-06-26 6,185 Dailymotion

Pune : पिंपरीत पंकजा मुंडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Pune : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर विविध मागण्या करीत भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुणे- मुंबई महामार्गावर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन चक्काजाम करण्यात आले. दरम्यान पंकजा मुंडे यांच्यासह आमदार महेश लांडगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भारतीय जनता पार्टी पुणे आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे सकाळी कात्रज चौक येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. त्यानंतर त्यांनी पिंपरीतही चक्काजाम आंदोलन केले. ओबीसी संघटना व समाजबांधव सहभागी झाले. दरम्यान कार्यकर्त्यांनी गर्दी करत सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन केले.

#PankajaMunde #OBCReservation #Pune