Random Video

पासवान यांच्या निधनाने बिहार निवडणूकीचे गणित बदलणार? Ram Vilas Paswan Passed Away | Bihar Election

2021-09-13 6 Dailymotion

लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून रामविलास पासवान हे आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. सध्या केंद्र सरकारमध्ये ते ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी सांभाळत होते.
पासवान यांनी गेल्या ३२ वर्षांत ११ निवडणुका लढवल्या होत्या. त्यापैकी ९ निवडणुकांत ते विजयी झाले होते. सध्याच्या मोदी सरकारमध्ये रामविलास पासवान ग्राहक, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार पाहत होते. दरम्यान, देशातील सहा पंतप्रधानांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याचा विक्रम पासवान यांच्या नावावर आहे. तसेच पासवान यांनी केंद्रात रेल्वे, माहिती प्रसारण, खनिज, रसायन, अन्न आणि नागरी पुरवठा अशा विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे.

#lokmat #Ramvilaspaswan #Biharelection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat