Random Video

Pune-Mumbai Expressway: दररोज 10,000 गाड्या करतात टोल - फ्री प्रवास ;पाहा व्हिडिओ

2022-01-21 3,120 Dailymotion

Pune-Mumbai Expressway: दररोज 10,000 गाड्या करतात टोल - फ्री प्रवास ;पाहा व्हिडिओ

कोणतेही वाहन टोल न देता जाऊ नये, अशी कडक व्यवस्था असतानाही पुणे - मुंबई महामार्गावरुन दररोज तब्बल 10 हजार वाहने टोल न देता प्रवास करत असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून करण्यात आलाय.

विकास महामंडळाकडे जितके टोल आहेत त्या सर्व टोलनाक्यांवरुन रोज किती व कोणत्या प्रकारची वाहने जातात व टोल वसूल केल्याची रक्कम याची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली गेली. पुणे - मुंबई महामार्गावरील डिसेंबर २०२१ महिन्याच्या आकडेवारीत या महामार्गावरुन दररोज 10 हजार वाहने टोल न देता जातात अशी माहिती समोर आली.

दुसऱ्या बाजूला ही माहिती संशयस्पद असून या टोल कंपनीची व त्याला जबाबदार असणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही चौकशी व्हावी या बद्दल चं पत्र देखील पाठवलं आहे. या प्रकरणी सरकार कधी आणि कशी दखल घेतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.