Random Video

New Parliament building: नवीन संसद भवन लवकरचं शासकीय कामासाठी खुले होणार

2023-01-20 27 Dailymotion

देशाच्या नवीन संसद भवन जानेवारीच्या अखेरीस पूर्ण तयार होणार आहे. भारत सरकारच्या आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाने त्रिकोणी आकाराच्या संरचनेच्या आतील भागांची अलीकडील काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. हे नवीन संसद भवन तयार असल्याची माहिती राज्यसभा खासदार सोनल मानसिंग यांनी ट्विटरवर दिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ३१ जानेवारीला नवीन लोकसभा भवनातून संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील त्याचप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारामनही १ फेब्रुवारीला याच नवीन सभागृहातून अर्थसंकल्प सादर करतील.