Random Video

Kasba Peth Bypoll: रविंद्र धंगेकरांची थेट लढत आता हेमंत रासनेंसोबत

2023-02-10 86 Dailymotion

Kasba Peth Bypoll: रविंद्र धंगेकरांची थेट लढत आता हेमंत रासनेंसोबत

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर भाजपकडून हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर, बिग बॉस फेम अभिजीत बिचकूले, संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते, आम आदमी पार्टीकडून किरण कद्रे आणि हिंदू महासंघाकडून आनंद दवे यांनी अर्ज दाखल केले होते. यामुळे या निवडणुकीत खरी रंगत आली होती. मात्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्या दिवशी संभाजी ब्रिगेडकडून अविनाश मोहिते, आम आदमी पार्टीकडून किरण कद्रे यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपकडून हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर या दोघांमध्ये ही लढत पाहण्यास मिळणार आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर धंरेकरांनी त्यांचे आभार मानले