Random Video

Chinchwad Bypoll: Devendra Fadnavis यांनी घेतली जगताप कुटुंबीयांची भेट; विजयाचा व्यक्त केला विश्वास

2023-02-16 22 Dailymotion

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी पक्षात बंडखोरी झाल्याने त्यामागे कोणतरी मोठा नेता असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला होता. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले असून महाविकास आघाडीला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आणि ते आमच्यावर आरोप करत आहेत. उगीच आमच्या डोक्यावर खापर फोडू नये. असा टोला त्यांनी अजित पवार यांना लगावला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या भरगोस मतांनी निवडून येतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.