Random Video

Eknath Shinde meets Raj Thackeray: शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; दोघांत नेमकी चर्चा काय?

2023-03-27 2 Dailymotion

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज यांनी मुख्यमंत्र्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे तसेच मनसेचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते. दरम्यान, राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत महिम समुद्रातील अनधिकृत बांधकामाचा विषय समोर आणला होता. त्यानंतर सरकारने त्यावर कारवाई देखील केली. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत.