पुणे लोकसभा मतदार संघासाठी भाजपमध्ये अंतर्गत रस्सीखेच पहायला मिळतेय, निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या मंडळीकडून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध उपक्रम घेतले जात आहेत. अद्याप लोकसभेची उमेदवारी निश्चित झालेली नाही तरीदेखील इच्छुक उमेदवारांनी पुण्याचे व्हिजन ठरवण्याचे काम हाती घेतले आहे