Random Video

शिर्डीतील दोन हॉटेलवर पोलिसांची छापेमारी; दोन पुरुषांसह चार महिला ताब्यात

2025-06-04 10 Dailymotion

शिर्डी : शिर्डीतील साई पालखी रोडवरील दोन हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. हॉटेल सावता आणि हॉटेल बारकाबाई गेस्ट हाऊस इथं पोलिसांनी छापा टाकत चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल चालक-मालक यांच्यावर पिटा अंतर्गत कारवाई केली असून या निमित्तानं अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. सण उत्सवासात साईबाबांचा रथ आणि पालखी जाणाऱ्या पवित्र मार्गावर हॉटेल सावता आणि बारकाबाई गेस्ट हाऊस इथं वेश्या व्यवसाय सुरु असल्याची तक्रार स्थानिकांनी शिर्डी पोलिसांत केली होती. त्यानंतर पोलिसांनी छापेमारी करुन हॉटेलची तपासणी केली. यावेळी पोलिसांनी चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतलं आहे. महत्वाचं म्हणजे सध्या ताब्यात घेतलेल्या महिलांवर याआधीही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांनी दिली.