Random Video

अमित ठाकरे स्वतः सक्षम, कोणाच्या सावलीखाली येण्याची गरज नाही; राहुल कनाल काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

2025-06-14 10 Dailymotion

शिर्डी : अमित ठाकरे यांच्याकडं अनेक पर्याय आहेत. त्यांनी स्वतः निवडणुका लढवल्या आहेत आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळं त्यांना कोणाच्या सावलीखाली येण्याची गरज नसल्याची माझी वैयक्तिक भूमिका असल्याचं शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांनी साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलतांना दिली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आणि काका-पुतणे एकत्र येत असतील तर ही अतिशय आनंदाची बाब आहे. तुटलेले कुटुंब पुन्हा एकत्र येणे ही महायुतीसाठी सकारात्मक गोष्ट असल्याचंही यावेळी राहुल कनाल म्हणाले.

शिवसेनेचे नेते आणि साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कनाल यांनी शनिवारी सहपरिवार शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. राहुल कनाल यांचा मुलगा सहा महिन्यांचा झाल्याने कनाल परिवाराच्या वतीने शिर्डीत भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलाय.