Random Video

उमाकिरण क्लासेस लैंगिक छळ प्रकरण : आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

2025-06-29 11 Dailymotion

बीड : शहरातील उमाकिरण कोचिंग क्लासेसमधील लैंगिक छळ प्रकरणी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर अशी या प्रकरणातील आरोपींची नावं आहेत. याबाबत माहिती देताना पोलीस निरिक्षक किशोर पवार यांनी सांगितलं की, "सरकारी वकिलांच्या वतीनं 7 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. कोचिंग क्लासेसमधील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुरावे तपासण्यासाठी पोलिसांनी ही मागणी केली होती. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे." 

तत्पूर्वी, बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 26 जूनला आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी फरार होते. पुण्याहून मांजरसुंबा चौसाळा परिसरात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावत आरोपींना ताब्यात घेतले.